वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे व्हेळकरवाडी येथील रमेश तुकाराम पाष्टे वय ६४ वर्षे या शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू झाला. गोवा बांबूळी येथे उपचारदरम्यान त्यांचा बुधवारी दिनांक 18 सप्टेंबर मृत्यू झाला.
मयत रमेश पाष्टे हे दिनांक १७ सप्टेंबर रोजी शेतात काम करीत असताना त्यांना सर्पदंश झाला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तिथून जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलवण्यात आले. तिथेही त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना गोवा बाबुळी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र गोवा बाबुळी येथे उपचारा दरम्यान दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा,तीन मुली, सून, जावई असा परिवार आहे.












