ओरोस (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंत यांच्यासह भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले नामदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस त्यांची कर्मभूमी डोंबिवली येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथे सदिच्छा भेट घेत प्रभाकर सावंत , रणजित देसाई यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.