करूळ घाटातील आधार भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे ; महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आराेप

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात सुरु असलेले आधार भिंतीचे काम इतर कामाप्रमाणेच निकृष्ट दर्जाचे सुरु असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.असा आरोप करीत हे निकृष्ट काम थांबाविण्यात यावे. अन्यथा काम बंद पडण्याच्या इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.

करूळ घाटाच्या नूतनीकरणाचे काम सुरु असून पहिल्याच पावसात नवीन नवीन बांधलेली संरक्षक भिंत कॉंक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचं वाहून गेल्यामुळे घाटातील काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण काम वादाच्या भोऱ्यात सापडले आहे. आता पाऊस कमी झाल्यामुळे काम सुरु करण्यात आले आहे. 

करूळ चेक नाक्या जवळ सध्या आधार भिंतीचे काम सुरु आहे. हे काम करताना बांधकामासाठी क्रेशरची ग्रीट वापरण्यात येत आहे. तसेच या मध्ये सिमेंटचा अतिशय कामी वापर करण्यात येत आहे. बांधकामासाठी काही प्रमाणात गोटा दगड वापरण्यात येत आहे. त्यामुळे हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्या दुर्लक्षामुळे  संपूर्ण घाट मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. हे निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवण्यात यावे अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

error: Content is protected !!