✍️ विशेष संपादकीय
राजन चव्हाण ( सिंधुदुर्ग ) : जेव्हा एखाद्या क्षेत्रात कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे रेडिमेड प्लॅटफॉर्म असतो तेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख दृढ करण्यासाठी करावे लागतात अथक प्रयत्न आणि घ्यावी लागते प्रचंड मेहनत . यासाठी काहींना अवघे आयुष्य पणाला लावावी लागते. परंतु आमदार नितेश नारायण राणे हे नाव याला अपवाद ठरले आहे. अवघ्या 10 वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाने व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटवण्यात नितेश राणे यशस्वी ठरले आहेत. वडील केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या आक्रमक स्वभावाचा डीएनए घेऊन जन्मलेल्या नितेश यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. अरे ला का रे म्हणत राणे पॅटर्न नावाची विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी निर्माण केलेली जरब आज नितेश राणे यांनी वाढवली आहे.त्यामुळेच नितेश राणे हे नाव जरी आले तरी विरोधकांच्या काळजात आधी धडकी भरते. राजकीय सामाजिक शैक्षणिक, क्रीडा ,धार्मिक , सांस्कृतिक, पर्यटन, आरोग्य क्षेत्रात नितेश राणे यांनी केलेले काम उत्तुंग असे आहे. भारतीय जनता पार्टीचा, हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून आज नितेश राणेंची ओळख आहे. भाजपा आणि शिंदे गटाच्या राज्यातील सत्तास्थापनेनंतर ठाकरे गटाची मुलूखमैदान तोफ असलेल्या संजय राऊत यांनी युती सरकारवर नेहमीच टीकेची झोड उठवत रान पेटवले. मात्र संजय राऊतांच्या आरोपांना बिनतोड उत्तर देणे ना भाजपला जमत होते ना शिंदे गटाला..अशावेळी भाजपाने आमदार नितेश राणेंवर ही जबाबादरी सोपवली आणि आता अवघा महाराष्ट्र बघतोय की नितेश राणेंच्या जवाबी हल्ल्यात राऊतांची तोफ बॅकफूटवर गेलेली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कमालीचे आक्रमक होत संपूर्ण महाराष्ट्रात नितेश राणे हिंदुत्वाचा आवाज बुलंद करत आहेत. 2014 साली पहिल्यांदा आमदार होण्यापूर्वी नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटना स्थापन करून सामाजिक कार्याला सुरुवात केली. मुंबई महानगर पालिकेच्या वॉटर टॅंक माफियाचा प्रश्न ऐरणीवर आणून त्यांनी जनतेची होणारी आर्थिक लूट उघड केली. सिनियर सिटीझन्स च्या प्रश्नांसाठी हेल्पलाईन सुरू करत त्यांना मदत मिळवून दिली. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून एकाच वेळी 25 हजार नोकऱ्या देणारा घेतलेल्या रोजगार मेळाव्याने नितेश राणेंचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाले. लंडन मध्ये शिक्षण घेतलेल्या एमबीए पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या नितेश राणे यांनी अवघ्या 10 वर्षांत आपल्या राजकीय जीवनात घेतलेली गरुडझेप निश्चितच कौतुकास्पद अशी आहे. समर्थ कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार वर्गाचा आवाज बुलंद करत त्यांचे हक्क मिळवून देण्यात नितेश नेहमीच अग्रेसर असतात. स्वाभिमान ट्रस्ट च्या माध्यमातून आजवर सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असलेल्या मुंबईतील महागड्या लीलावती, हिंदुजा व अन्य नामांकित हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्णांचे लाखो रुपये खर्च असणारी ऑपरेशन, वैद्यकीय उपचार त्यांनी अगदी मोफत करून दिले आहेत. राज्यभरात कार्यरत असताना आपले होमपीच असणाऱ्या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाच्या विकासाला आमदार नितेश राणे यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सत्ताधारी पक्ष्याचा आमदार म्हणून नितेश यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे. या मतदारसंघाला भूतकाळात कधीच मिळाला नव्हता एवढा 400 कोटींहून अधिक विकास निधी फक्त एका वर्षात नितेश यांनी आणला आहे. आपल्या मतदारसंघात रस्ते, पूल, पाणी, वीज आदी नागरी सुविधा पुरवितानाच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याकडे त्यांनी नेहमीच कटाक्ष ठेवला आहे. कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील दीडशेहून अधिक प्राथमिक शाळा कॉर्पोरेट कंपन्यांच्या एस आर मधून डिजिटल स्कुल केल्या. शाळेपासून घराचे अंतर लांब असल्यामुळे शिक्षणात खंड पडून शिक्षण थांबू नये म्हणून 350 हुन अधिक गरजू आणि होतकरू शाळकरी मुलींना स्वखर्चाने मोफत सायकल वाटप सुरू केले आहे.देवगड कणकवली वैभववाडी च्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून विविध उपक्रम सुरू केले . विशेषतः देवगड तालुक्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी नितेश यांनी केलेल्या उपक्रमांना तोड नाही.सिंधू फिल्म फेस्टिव्हल, मिसळ महोत्सव पर्यटन महोत्सव, व्हॅक्स म्युझियम, पवनचक्की पर्यटन आदि उपक्रमांमुळे देवगड शहराकडे आज पर्यटकांचा ओघ वाढला आहे.पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना शाश्वत रोजगार मिळवून देण्यला नितेश यांनी प्राधान्य दिले आहे. बेधडक रोखठोक व्यक्तिमत्व असलेल्या नितेश राणेंची राजकीय चाणक्य नीती अचंबित करणारी आहे.आपल्या राजकीय डाव आणि प्रतिडावानी विरोधकांना धोबीपछाड देत आपल्या मतदारसंघात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपातळीवरील विकास सोसायट्या, तालुका शेतकरी संघ आदींवर फक्त आणि फक्त भाजपाचीच मोहोर नितेश यांनी उमटवली आहे.राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वतः प्रचार यंत्रणे ची सूत्रे हलवत अशक्य असा मिळवलेला विजय म्हणजे नितेश यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा जिवंत दाखला होय. जनतेच्या कामांसाठी प्रसंगी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे आवश्यक असेल तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाठराखण ही करतात हे विशेष आहे. आपल्या कार्यकर्त्यांना जीवापाड जपणाऱ्या, जनसेवेसाठी अथक मेहनत घेणाऱ्या आमदार नितेश राणेंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज च्या मनःपूर्वक शुभेच्छा












