श्री क्षेत्र जोतिबा यात्रेसाठी वाहतुकीबाबत निर्देश जारी

वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक व प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी-रत्नागिरी) येथे 30 मार्च ते 1 एप्रिल रोजी पर्यंत श्री जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा साजरी होत आहे. जोतिबा डोंगर येथील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटार वाहनाचे पार्किंग होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी वाहतूक निर्देश जारी केले आहेत.

वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक व प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग -(यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळून)

अ) जोतिबा डोंगरावर जाण्याकरिता रहदारी नियमन :-
30 मार्च रोजी रात्री 8 वा. पासुन मालाने भरलेले ट्रक, अवजड वाहने, तीनचाकी प्रवासी व माल वाहतूक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना जोतिबा डोंगरावर जाण्यास केर्ली, कुशिरे, वाघबीळ, गिरोली या नाकाबंदी ठिकाणाहून पुढे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या मालाची वाहतूक त्यापुर्वी सोयीनुसार करावी.

1 एप्रिल रोजी मुख्य जोतिबा यात्रा असल्याने या दिवशी सकाळी 5 वा. पासून सर्व दुचाकी वाहनांना जोतिबा डोंगरावर दानेवाडी क्रॉसिंग आणि जुने आंब्याचे झाड येथून वर तसेच गिरोली फाटा या ठिकाणावरुन प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. चारचाकी व इतर वाहनांना जोतिबा डोंगरावर पार्किंग करीता जागा अपुरी पडल्यास परिस्थिती अनुरूप सर्व मोटार वाहने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पार्कीग ठिकाणी नवीन अंब्याचे झाड ते जुने आब्यांचे झाड आणि श्रावणी हॉटेल/गिरोली फाटा ते दानेवाडी फाटा परिसर या ठिकाणी केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहने पार्क करावीत आणि तेथून श्री जोतिबा डोंगरावर उपलब्धतेनुसार मोफत एस.टी. किंवा के.एम.टी. या सार्वजनिक बसेसचा उपयोग करावा, भाविकांनी आपली वाहने नवीन आंब्याचे झाड ते जुने आंब्याचे झाड आणि श्रावणी हॉटेल/गिरोली फाटा ते दानेवाडी फाटा या भागात डोंगराच्या पायथ्याशी नियोजीत ठिकाणी पार्क करुन यात्रा सुरळीत व सुरिक्षत पार पाडण्यासाठी व भाविकांना होणा-या अडचणी व त्रास टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

केर्ली किंवा कुशिरे गावावरुन येणा-या सर्व मोटार वाहनांनी (यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळून) सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुख जुने आंब्याचे झाड मार्गे जोतिबा डोंगरावर रवाना व्हावे आणि पार्किंगच्या नियोजीत जागेमध्ये आपली वाहने पार्क करावीत. अशाच प्रकारे गिरोली किंवा यमाई कडून येणा-या सर्व मोटार वाहनांनी (यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळून) गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) येथून सरळ जोतिबा डोंगरावर रवाना व्हावे आणि पार्किंगच्या नियोजीत जागेमध्ये आपली वाहने पार्क करावीत. श्री जोतिबा डोंगर ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गाने सुरु राहील.

ब) जोतिबा डोंगर उतरण्यासाठी रहदारी नियमन :-
श्री जोतिबा मंदीर येथून दर्शन घेवून परत जाणाऱ्या भाविकांनी (ग्रामपंचायत, मेन पार्किंग व यमाई पार्किंग येथे पार्क असलेल्या वाहन चालकांनी) गिरोली मार्गे, कोल्हापूर व इतर ठिकाणी मार्गस्त व्हावे. श्री जोतिबा मंदीर येथून देव दर्शन घेवून परत जाणाऱ्या भाविकांनी (ट्रक ट्रॅक्टर सेंट्रल प्लाझा येथील पार्किंग ते नवीन एस टी स्टॅड येथे पार्क असलेल्या वाहनांनी जुने आंब्याचे झाड ते गायमुख ते केलें मार्गे किंवा दानेवाडी, वाघबीळ मार्गे कोल्हापूर व इतर ठिकाणी मार्गस्त व्हावे.

1 एप्रिल रोजी सायंकाळी अंदाजे 6 वा. चे सुमारास यात्रा संपल्यानंतर मोटार वाहने एकाचवेळी मोठ्या प्रमाणात जोतिबा डोंगरावरुन घाट रस्त्याने खाली येणार असल्याने या दिवशी दुपारी 4 वा. पासून यात्रा उतरेपर्यंत केर्ली फाटा व गिरोली गावचा टी पॉईंट रस्ता या ठिकाणावरुन तसेच इतर कोणत्याही मार्गावरुन जोतिबा डोंगरावर जाण्यास एस.टी. बस सह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पालखी सोहळा कार्यक्रमासाठी येणा-या भाविकांनी दुपारी 4 पूर्वी जोतिबा डोंगरावर पोहचण्याची दक्षता घ्यावी.

यात्रा संपल्यानंतर घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व वाहने (दुचाकी खेरीज करुन) जुने आंब्याचे झाड येथून गायमुख मार्गे केर्लीकडे रवाना होतील. श्री जोतिबा मंदीर या ठिकाणी यात्रेकरीता आलेल्या भाविकांनी यात्रा उतरताना गिरोली फाटा येथून जाणारी सर्व वाहने सादळे मादळे मार्गे तसेच यमाई पायरी पासून वाहने दानेवाडी फाटा मार्गे (दानेवाडी क्रॉसिंगकडे न जाता ) वाघबीळ मार्गे रवाना होतील. केर्ली,

वाघबीळ, माले फाटा, दानेवाडी क्रॉसिंग, गिरोली फाटा या मार्गावरुन पुढे जोतिबा डोंगरावर जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना (यात्राविषयक अत्यावश्यक सेवेतील व शासकीय वाहनांना वगळून) मनाई करण्यात येत आहे.

केलीं ते जुने आंब्याचे झाड ते दानेवाडी क्रॉसिंग ते MTDC रेस्ट हाऊस ते सेंट्रल प्लाझा ते यमाई टोल नाका ते गिरोली फाटा ते दानेवाडी रस्त्यावरील निलगिरी बाग या दरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व वाहन पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे. 30 मार्च रोजी रात्री 8 ते 1 एप्रिल रोजी रात्री 11 वा.पर्यंत कोल्हापूर ते बोरपाडळे फाटा या मार्गावरील अवजड वाहने, एक अॅक्सल पेक्षा जादा अॅक्सलची वाहने व मालवाहतूक करणारे ट्रॅक्टर्स इ. वाहनांना बोरपाडळे या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे. रत्नागिरी दिशेकडून येणा-या / जाणा-या वाहनांनी बोरपाडळे फाटा- कोडोली वाठार मार्गे राष्ट्रीय महामार्ग या मार्गाचा ये-जा करण्यासाठी वापर करावा.

श्री जोतिबा मंदीर येथील यात्रा संपल्यानंतर मातोश्री लॉज ते दानेवाडी फाटा एकेरी वाहतूक सुरु राहील. दानेवाडी फाट्यापासून मातोश्री लॉजकडे जाणा-या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. मातोश्री लॉज यमाई पायरी क्र. 1 व 2 निलगिरी बाग लादे मळा या ठिकाणी पार्किंग करण्यात आलेल्या वाहन चालकांनी दोनवाडी फाटा मार्गे माले फाटा/वाघबीळ मार्गे सोयीनुसार मार्गस्थ व्हायचे आहे.

क) जोतिबा यात्रेनिमित्त मोटार वाहन पार्किंग व्यवस्था :-
महत्वाची पार्किंग
मेन पार्किंग – मंदीराकडे जाणारे बुमजवळ – सासन काठी राखीव
सेंट्रल प्लाझा- ट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रॅक्टर व इतर मोठी वाहने

ड) गिरोली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी पार्किंग –
चारचाकी वाहनांसाठी पार्किंग
यमाई वळणावर, यमाई डावी बाजू, यमाई उजवी बाजू, बुने कॉर्नर, श्रावणी हॉटेलच्या पाठीमागे, श्रावणी हॉटेल के. एम.टी./बस स्टॉप च्या बाजुला, तीव्र वळणाच्या बोर्डाजवळ पडकी इमारत, यमाई पायरी जवळ पार्किंग क्र. 1, यमाई पायरी जवळ क्र. 2, यमाई पायरी समोर, निलगिरी बाग, निलगिरी बाग समोर क्र. 1, निलगिरी बाग समोर क्र. 2, लादे मळा, मातोश्री लॉजिंग डावी बाजू, दोनवाडी फाटा व बुणे फार्म हाऊस पाठीमागे

दुचाकी वाहनांसाठी पार्किंग- यमाई मंदीराच्या पाठीमागे, बुने फार्म हाऊस, श्रावणी हॉटेल समोर रो हाऊस च्या पाठीमागे चढावर

ई) केर्ली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी पार्किंग : –
चारचाकी वाहनांसाठी पार्किंग- जुने एस.टी. स्टेंड समोर MTDC वळणावर, पिराचा कडा, तोरणाई कडा, नवीन एस.टी. स्टैंड च्या पाठीमागे, जुने आंब्याचे झाड डावी बाजु क्र. 1, जुने आंब्याचे झाड डावी बाजु क्र. 2, नवीन आंब्याचे झाड फार्म हाऊस डावी बाजू, गायमुख इनाम पार्किंग व शेवताई

दुचाकी वाहनांसाठी पार्किंग- MTDC समोर, टोल नाक्याच्या बाजुला तळ्याजवळ, नवीन आंब्याचे झाड फार्म हाऊस उजवी बाजू

वाडी रत्नागिरी श्री जोतिबा मंदीर या ठिकाणी यात्रेकरीता येणा-या भाविकांसाठी वरील प्रमाणे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून भाविकांनी नमुद पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहने पार्क करावीत इतर कोणत्याही ठिकाणी /रहदारीच्या रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात येत आहे.प्रथम डोंगरावरील पार्कीग भरल्यानंतर डोंगर पायथ्याची पार्कंग ठिकाणे भरली जातील. डोंगर पायथ्याशी वाहने पार्क करुन डोंगरावर जाण्यासाठी मोफत बसची सोय केलेली आहे.

वाहतुकीचे एकेरी मार्ग व प्रवेश बंद हे नियमन 30 मार्च रोजी रात्री 8 वा. पासून ते 1 एप्रिल रोजी रात्री 11 वा. पर्यंत करण्यात येत आहे. तसेच वाहनांची गर्दी व घाट मार्गातील परिस्थिती आणि डोंगरावरील पार्किंगची परिस्थिती पाहून वाहतूक चालू किंवा बंद करण्याचा अधिकार यात्रा बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांना देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाहतूक तसेच पार्किंगमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील, अशी माहिती शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.

error: Content is protected !!