पालकमंत्री नीतेश राणेंच्या नेतृत्वात सलग दुसऱ्या वर्षी डीपीडीसी चा 100 टक्के निधी खर्च

मार्च अखेरपूर्वी निधी खर्चात सिंधुदुर्ग राज्यात प्रथम

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ):  प्रशासकीय यंत्रणा चालवायला लागणारे 40 टक्केहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पदे रिक्त असतानाही पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झालेला एकून 282 कोटी निधी विकासकामांवर खर्च करून 100 टक्के निधी आर्थिक वर्ष अखेर आधी खर्च करण्याचा विक्रमच स्थापित केलाय असे म्हणावे लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने नामदार नीतेश राणेंच्या खांद्यावर सोपवली. पालकमंत्री झाल्यावर मंत्री नीतेश राणे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत एक महत्वाचे स्टेटमेंट दिले होते. मला जिल्हा प्रशासन केवळ चालवायचे नाहीय तर पळवायचे आहे. अर्थात जिल्हा प्रशासन पळवायचे म्हणणे म्हणजे प्रशासनातील कच्चे दुवे हेरने आणि त्यात दुरुस्ती करून जनहितासाठी लोकाभिमुख प्रशासन राबवणे.पालकमंत्री या नात्याने नामदार नितेश राणे यांनी आपल्या हटके राणे स्टाईल ने मागील आर्थिक वर्ष संपायच्या आधीच जो इशारा दिला तो परफेक्ट लागू पडला. अगदी 3 महिन्यांच्या काळात डीपीडीसी चा विकासनिधी खर्च करण्याचा बॅकलॉग भरून काढून 31 मार्च च्या आधीच दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झालेला 100 टक्के निधी खर्च झाला होता. 2024 -25 या आर्थिक वर्षात पालकमंत्री नीतेश राणेंच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 टक्के डीपीडीसी चा निधी खर्च झाला होता. आर्थिक वर्ष 2024 -25 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा डीपीडीसी निधी प्रथम 100 टक्के खर्च करण्यात संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकावर होता.आर्थिक वर्ष 2025-26 साल साठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विभागला 282 कोटींचा विकास निधी प्राप्त झाला होता. पालकमंत्री नीतेश राणे यांनी सुरुवातीलाच हा सर्व निधी आर्थिक वर्षपूर्ती आधीच खर्च करण्याचे सक्त निर्देश जिल्हा नियोजन विभागला दिले होते. त्यानुसार प्रशासनाच्या कॅप्टन असलेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीही आपल्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांकडून मेहनत करवून घेतली. आणि टीमवर्क करून  पालकमंत्री नितेश राणे यांना अपेक्षित 100 टक्के विकासनिधी मार्च अखेर आधीच खर्च केला गेलाय. आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा डीपीडीसी निधी 100 टक्के खर्च करून दाखविण्यात सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल क्रमांकावर राहिलाय तो पालकमंत्री नीतेश राणेंची प्रशासनावर असलेल्या कमांड मुळे.

error: Content is protected !!