आ. नितेश राणे वाढदिवसामित्त आयोजित रक्तदान शिबिर लकी ड्रॉ मध्ये अमित सावंत याना वॉशिंग मशीन

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपाच्या वतीने कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संजय उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांची गर्दी पाहायला मिळाली रक्तदात्यांसाठी खास लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे दिली गेली या लकी ड्रॉमध्ये प्रथम अमित पाटील (वॉशिंग मशीन) द्वितीय संदेश परुळेकर (ओव्हन) तर तृतीय मिथुन ठाणेकर (गॅस शेगडी) असे बक्षिसाचे स्वरूप होते तर प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली या आगळ्यावेगळ्या रक्तदान शिबिराची संकल्पना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची असून या रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले होते.

error: Content is protected !!