पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय येथे काल माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी कसे हानीकारक आहे याचा संदर्भ दर्शवणारी चित्रे रेखाटली होती. पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.खंडागळे यांनी सदर स्पर्धेच्या चित्रांचे परिक्षण करुन अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ दोन चित्रांची निवड केली. यामध्ये नम्रता नामदेव चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला असून शिवानी रत्नाकर फुटक हिने द्वितीय क्रमांक तर अनुष्का तानाजी कांबळे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. याशिवाय वैष्णवी गणेश हावळ व वेदा लवू पारकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे प्रथम तिन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सहभागी सर्व विद्यार्थांना कलाशिक्षक एम.एस.चोरगे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक व प्रशासनाने शाळा महाविद्यालयांमध्ये राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी या कार्यक्रम प्रसंगी दार्थांच्या सेवनापासुन विद्यार्थी व पालक यांना दुर राहण्याचा सल्ला दिला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई, कला शिक्षक एम.एस.चोरगे. पोलिस हवालदार अभिजित तावडे, गणेश भोवड तसेच प्रशालेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.बोलताना व्यक्त केले. तर पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई यांनी सहभागी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक व संस्थेचे आभार व्यक्त केले व अंमली पदार्थांच्या सेवनापासुन विद्यार्थी व पालक यांना दुर राहण्याचा सल्ला दिला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई, कला शिक्षक एम.एस.चोरगे. पोलिस हवालदार अभिजित तावडे, गणेश भोवड तसेच प्रशालेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.