कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ : सिंधुदुर्गात पाऊस सुरू झाला असून काही ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडलेत. आज सकाळी ११ च्या सुमारास कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील पिंगुळी येथे मोठे झाडे पावसात रस्त्यावर कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तर येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. सदर झाड काही वेळात बाजूला करून येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
कुडाळ – वेंगुर्ले मार्ग काही काळ बंद












