सुभाष चौगुले सहा.संचालक म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे होते कार्यरत
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ३ (१) मधील तरतुदीनुसार दिनांक ३१.५.२०२३ रोजी पदस्थापनेच्या पदावर तीन वर्षाचा कालावधी पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव नागरी सेवा मंडळ क्र. १ समोर सादर करण्यात आला होता. नागरी सेवा मंडळाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या पूर्व मान्यतेनुसार शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. सिंधुदुर्ग येथे मुश्ताक शेख यांच्या बदलीने होणाऱ्या रिक्त होणाऱ्या पदाची जबाबदारी सुभाष राजाराम चौगुले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापुर्वी सुभाष चौगुले सहा. संचालक, म्हणून शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे होते कार्यरत.












