आ.नितेश राणेंचा वाढदिवस फणसगाव, विठ्ठलादेवी येथे उत्साहात साजरा

रिक्षाचालकांना मोफत रेनकोट, शालेय मुलांना छत्री,खाऊवाटप

देवगड(प्रतिनिधी) : सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ज्यांचा एक फोन कॉल गेला की लगेच मॅटर सॉल्व्ह होतो अशा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस देवगड तालुक्यातील फणसगाव, विठ्ठलादेवी येथे मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कट्टर राणे समर्थक असलेले भाजपा कार्यकर्ते महेश उर्फ़ बंड्या नारकर यांच्या आयोजनाखाली आमदार नितेश राणे यांच्या वाढ दिवसानिमित्त रिक्षाचालकांना मोफत रेनकोट वाटप, शालेय मुलांना छत्री आणि खाऊवाटप करण्यात आले. विठ्ठलादेवी प्राथमिक शाळा विठ्ठलादेवी येथील शालेय विद्यार्थ्यांना मुलांना खाऊ व छत्री वाटप करण्यात आले. तसेच फणसगाव परिसरातील ऑटो रिक्शा व्यावसायिकांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. या वेळी भाजपा पडेलमंडळ अध्यक्ष डॉ.अमोल तेली,माजी सभापति रवी पाळेकर,भूषण बोडस, उत्तम बिर्जे,बंड्या नारकर,कृष्णा नर, उदय पाटील,राजू जठार,बाबा नारकर,भाई नारकर,काका बाने,सागर नारकर आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!