” विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच ध्येय निश्चित करावे ” :- डॉ. सजय पोळ

चौके हायस्कुल येथे गुणवंत विद्यार्थी- शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न

सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजन खोचरे यांचाही सेवानिवृत्तीपर गौरव

चौके ( अमोल गोसावी ) :चौके पंचकौशी शिक्षण प्रसारक, मंडळ मुंबई संचलित भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या प्रशालेतील मार्च २०२३ , दहावी तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील यशवंत व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वार्षिक गौरव सोहळा तसेच नुकतेच निवृत्त झालेले माजी मुख्याध्यापक श्री. राजन न्हानू खोचरे सर यांचा सेवानिवृत्त्तीपर सेवा साफल्य सोहळा शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहानं चौके हायस्कुलच्या जयप्रकाश हॉल येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डाँ. संजय पोळ-वैद्यकीय अधिकारी कट्टा, अध्यक्ष स्थानी श्री जगदिश परब- संस्था अध्यक्ष मुंबई, तसेच बिजेंद्र गावडे- स्थानिक संस्था अध्यक्ष, संतोष धुरी-संस्था सरचिटणीस, सुरेश चव्हाण- संस्था खजिनदार, विनायक गावडे-संस्था उपाध्यक्ष, प्रविण चव्हाण, अनिल सुकाळी, कमलाकर गावडे, धानजी चव्हाण, किशोर वाक्कर, श्यामसुंदर मेस्री, मोहन गावडे, सायली सकपाळ, कविता गावडे, निरा सावंत, नंदू राणे, बबन आंबेरकर, दत्ता गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी, माजी मुख्याध्यापक राजन खोचरे, राखी खोचरे तसेच निवृत्त शिक्षक श्री. आडकर सर, वाडेकर मँडम, कुलकर्णी मँडम यांच्यासह पालक आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
चौके पंचक्रौशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई- स्थानिक संस्था व चौके हायस्कुल यांच्या सयुक्त विद्यमाने दरवर्षी दहावी उतीर्ण विद्यार्थी गुणवंत शिक्षक- कर्मचारी यांचा संस्थेच्यावतीने गुणगौरव सोहळा साजरा केला जातो.गेली चार वर्षे सलग १००% निकालाची परंपरा यावर्षी राखली गेली.यावेळी मार्च २०२३ दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पंचकौशीतील दात्यांकडून देण्यात येणारी रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षा व इतर विषयांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. पोळ यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ” मुलांनी शालेय जीवनात जास्तीत जास्त अभ्यासावर भर देत आपले ध्येय निश्चित करावे. आणि ते पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत. प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य असते. यश अपयश आले तरी ते पचवायला शिका. यावर्षी आपल्या जिल्ह्यातील तीन विद्यार्थी यु.पी.एस.सी परीक्षेत उतीर्ण झाले ही आपल्या जिल्हासाठी गौरवाची बाब आहे . आपणही भविष्यात अश्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी होऊ शकता. यासाठी प्रंचड मेहनत घ्यावी लागते हे लक्षात ठेवा. व्यासपिठावर उपस्थित मान्यवर याच शाळेतील विद्यार्थी असून आज काही ना काही व्यवसायात आहेत आज शाळेतील अनेक मुले डाँक्टर, शिक्षक, इंजीनीअर, वकील याशिवाय मोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत याचाही अभिमान आहे.” यावेळी संस्था अध्यक्ष जगदिश परब, संतोष धुरी,सदाशीव गावडे गुरुजी, कुलकर्णी मँडम, बिजेंद्र गावडे, राजन खोचरे, यांनी आपले विचार मांडले.
चौके गावातील जेष्ठ प्राथमिक शिक्षक व शालेय कार्यक्रमाना आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करणारे सदाशिव लक्ष्मण गावडे गुरुजी यांना नुकतीच ८० वर्षे पूर्ण झाली यानिमित्त संस्था तसेच प्रशालेच्या वतीने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापिका रसिका गोसावी यांनी केले सुत्रसंचालन सौ. परब मॅडम, तर आभार दत्तप्रसाद परुळेकर सर यांनी केले.

error: Content is protected !!