हिंदळे प्राथमिक शाळेवर काजुचे झाड कोसळले ; १ लाख रुपयांचे नुकसान
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात दुस-या दिवशीही पावसाने जोरदार सुरूवात केल्याने हिंदळे शाळेवर काजुचे झाड कोसळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
शुक्रवारपासून पावसाने दमदार सुरूवात केली.दोन दिवसात १८३ मिमी पावसाची नोंद झाली असून रविवारी सकाळी ९२ मिमी पावसाची नोंद झाली.अतिवृष्टीमुळे हिंदळे नं.१ शाळेवर काजुचे झाड पडून पाण्याची टाकी १ हजार लीटर, शौचालयाचे पत्रे तुटून १ लाखाचे नुकसान झाले.












