रिक्त प्राथमिक शिक्षकांचा प्रश्न आठवड्याभरात सोडवणार – मंत्री दीपक केसरकर

दरमहा 20 हजार मानधनावर करणार शिक्षक नियुक्ती

सावंतवाडी (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळेंतील शिक्षकांच्या रिक्त जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन अग्रक्रमाने प्रयत्नशील असून त्याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.शिक्षकांच्या रिक्त जागी सेवानिवृत्त शिक्षक अथवा डी.एड, बी.एड उमेदवारांना सामावून घेतले जाणार आहे. त्यांना दरमहा वीस हजार रुपये मानधन सुद्धा शासनाकडून ठरविण्यात आले आहे. मात्र भविष्यात ते नोकरीत कायम करा असा दावा करू शकत नाहीत. याबाबतचा शासन अध्यादेश आठवडाभरात काढू, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे केली. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, गजानन नाटेकर, नारायण राणे, अभिजीत मेस्त्री, संजय माजगावकर आदी उपस्थित होते

error: Content is protected !!