हडपीड स्वामी समर्थ मठाचे विनोद आईर आदर्श समाजसेवक तर वाडा सरपंच सुनील जाधव आदर्श सरपंच पुरस्काराने सम्मानित

देवगड (प्रतिनिधी) : हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी कराड व राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त निमंत्रितांचे कवी संमेलन व द्वितीय राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार वितरण २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी श्री देव रवळनाथ रंगमंच ओरस (सिंधुदुर्गनगरी) या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित स्वामी समर्थ मठ हडपिडचे गाव समिती सचिव विनोद बाबू आईर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आदर्श समाजसेवक पुरस्कार तसेच देवगड वाडा गावचे सरपंच सुनील रोहिदास जाधव यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन या संस्थेचे अध्यक्ष सुनिल फडतरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदत्त सामंत यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

यावेळी दिलीप मेस्त्री,ज्ञानदेव मेस्त्री,महेश जुवाटकर, डॉ अभिनंदन मालंडकर,सुहास परब चंद्रकांत ओरसकर,माळी सर,प्रभाकर सावंत, सावंत सर,आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!