आमदार नितेश राणेंचा वाढदिवस लोरे नं 2 गावात सामाजिक उपक्रमांनी केला साजरा

लोरे नं 2 मधील जि.प.च्या सर्व शाळांत मोफत वह्यावाटप

फोंडाघाट (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 गावात मोठ्या उत्साहाने सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.आ.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांच्या माध्यमातून लोरे नं.2 गावातील राणेवाडी. मोगरवाडी. मांजलकरवाडी.केंद्र शाळा हेळेवाडी.या चारही शाळांमध्ये मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा शक्ती केंद्र प्रमुख रितेश मेस्त्री. बुथ अध्यक्ष भरत मांजलकर.दशरथ बोबकर. प्रकाश गवाणकर. निलेश मांजलकर. चंद्रकांत कदम. अनंत तरफे , सर्व शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!