खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे छ.शाहू महाराज जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची १४९ वी जयंती मोठ्या उस्ताहात साजरी करण्यात आली. शाळेच्या सेवा निवृत्त शिक्षिका स्मिता कोरगावकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तर शाळेच्या सहाय्यक शिक्षिका रुपाली पारकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर, रेखा लांघी,अलका मोरे, काझी मेडम, ब्रम्हदंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेच्या शिक्षकांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्र विषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी यांनी मानले.

error: Content is protected !!