कणकवलीत गांज्यासह विक्रेते पकडले रंगेहाथ; 2 आरोपींना अटक 1 पसार

एलसीबी ची मध्यरात्री कारवाई, तिन्ही आरोपी नाटळ गावचे रहिवासी

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एकसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यातील एक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपी वैभव सीताराम पांगम वय ( 25 वर्षे ), स्वप्नील सुरेश कुडतरकर ( वय 30 वर्षे ), रामदास तुकाराम पांगम ( तिघे रा.नाटळ , ता. कणकवली ) असून यातील संशयित आरोपी रामदास पांगम हा पसार झाला आहे. एलसीबी पोलीस निरीक्षक भोसले यांनी स्वतः फिल्डवर उतरत ही कारवाई केली. एलसीबी पीआय भोसले यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय शेळके, हवालदार राजू जामसंडेकर गुरू कोयंडे, गंगावणे, कृष्णा केसरकर यांनी ही कारवाई 28 जून रोजी मध्यरात्री 3 वाजून 21 मिनिटांनी केली. आरोपींकडून 1 किलो 310 ग्राम चा 39 हजार रुपयांचा गांजा, एक मोटरसायकल, 2 मोबाईल, दोन चिलीम, वजनकाटा, रोख 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. एलसीबी पोलीस हवालदार कृष्णा केसरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोवयापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 ( क ), 20 ( ब ), 2 ( ब ) प्रमाणे कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बापू खरात करत आहेत.

error: Content is protected !!