मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष पदी मालवण तालुका भाजपा सरचिटणीस महेश मांजरेकर यांची निवड पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारसीने करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यपदी राजेश शिवराम तांबे, श्रीमती. माधुरी मोहन मसुरकर, राजन शांताराम माणगावकर, जयप्रकाश कृष्णाजी परुळेकर, राजेंद्र संभाजी आंबेरकर, मधुकर जगन्नाथ चव्हाण यांचा समावेश आहे. शिवाय या समितीत शासकीय प्रतिनिधी म्हणून गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी असणार आहेत. तर समिती सदस्य सचिव हे तहसीलदार तथा नायब तहसीलदार असणार आहेत. अभ्यासू व उत्कृष्ट वक्तृत्व महेश मांजरेकर यांनी गेली दोन टर्म हडी गावचे सरपंच म्हणून भूषविले आहे. अनेक योजना त्यांनी गावात राबविल्या. नुकत्याच झालेल्या मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आले आहेत. तर भाजपच्या मालवण तालुका सरचिटणीस म्हणून यशस्वीरित्या काम करत आहेत. एक अभ्यासू नेतृत्व असलेल्या महेश मांजरेकर यांच्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी नव्याने दिली आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी महेश मांजरेकर










