जयंत पाटील, प्रवीण दरेकर यांची असणार विशेष उपस्थिती
सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ४० वा वर्धापन उद्या सकाळी १०.३० वाजता येथील शरद कृषी भवन मध्ये साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, राजगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला सर्व ग्राहक व हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.












