ब्युरो न्युज (मुंबई) : बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 25 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हे वृत मन हेलावणारे असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले आहेत. सरकारनं अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे उद्धव टाकरेंनी म्हटलंय.













