गावच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामसेवक – जयेंद्र रावराणे

वैभववाडीतील ग्रामसेवक उमेश राठोड व वर्षा राठोड या उभतांचा सदिच्छा समारंभ संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात ग्रामसेवक म्हणून सलग ११ वर्षे कार्यरत राहिलेले उमेश राठोड तसेच वैभववाडी तालुक्यातच ९ वर्षे ग्रामसेवक म्हणून कार्यरत राहिलेल्या वर्षा राठोड या उभयतांच्या उस्मानाबाद येथे बदली झाल्याने वैभववाडी येथे मा. वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे व तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच भेट वस्तू देऊन राठोड उभयतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामसेवक हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो असे प्रतिपादन या कार्यक्रम प्रसंगी बोलताना जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले.यावेळी मा. वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष विद्याधर सावंत, विजय रावराणे,राठोड कुटुंबीय व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!