बीएसएनएल च्या नावाने मेसेज पाठवत ओटीपीद्वारे लुबाडणुकीचे प्रयत्न

सावंतवाडी शहरात उडाली खळबळ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपले सिम कार्ड ब्लॅक आऊट होणार अशा प्रकारची नोटीस बीएसएनएलच्या नावाने मोबाईलवर पाठवून ओटीपीच्या सहाय्याने ग्राहकांना लुबाडण्याचे प्रयत्न सध्या सुरू असून सावंतवाडीत अशा सकाळच्या नोटिसा काही जणांना आल्या असून जिल्हा पोलीस यंत्रणेने सायबर क्राईमच्या माध्यमातून असे प्रयत्न हाणून पाडावेत असे मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे.

सावंतवाडी शहरात काही जणांच्या मोबाईलवर बीएसएनएल चा लोगो आणि तसेच राजमुद्रा चिन्ह असलेली इंग्रजीतील नोटीस मोबाईलवर आली आहे त्यामध्ये तुमच्या सिम कार्डची व्हॅलेडीटी संपणार असून सिम कार्ड ब्लॅक आऊट होणार आहे आपण 24 तासात आम्हाला कॉल करा असे इंग्रजीत म्हटले आहे. त्यामुळे काहींना या संदर्भात संशय आला असून ओटीपी च्या माध्यमातून एक प्रकारे लुबाडण्याचा प्रकार असल्याने त्यांनी दुर्लक्ष केले आहे परंतु हा प्रकार सर्वसामान्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याने माजी नगरसेवक श्री भोगटे यांनी त्यामागील टोळीचा जिल्हा पोलीस यंत्रणेने तपास लावावा व त्यांचे हे प्रकार आणून पडावेत अशी मागणी केली आहे.

श्रीभक्त म्हणाले यापूर्वी महावितरण च्या नावाने मोबाईलवर मेसेज पाठवून लुबाडण्याचे प्रकार समोर आले होते सावंतवाडीतील काही जणांना याचा आर्थिक पटका ही बसला आहे आता नवीन चक्क लढून बीएसएनएलच्या नावे या महाठगाकांकडून प्रयत्न सुरू आहे तरी असे संदेश किंवा नोटीस कोणाला आल्यास त्यांनी घाबरून न जाता संबंधित विभागाला कल्पना द्यावी व खात्री करावी असे आवाहनही श्री भोगटे यांनी केले आहे

error: Content is protected !!