जि.प. प्रशासनाच्या वतीने जि.प. व पं.स. अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी १ ते २ फेब्रुवारी दरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी १ ते २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सांघिक व वैयक्तिक प्रकारातील विविध स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना महामारी मुळे गेली तीन वर्षे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. यावर्षी या स्पर्धा १ व २ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायम शासकीय कामात व्यस्त असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यातील क्रीडा गुण दाखवण्याची संधी मिळणार आहे. नेहमीच कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता पोलीस कवायत मैदान येथे होणार आहे. तर या स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धा होणार असून महिला व पुरुष गटातील क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, खो खो, हॉलीबॉल, रस्सीखेच, लंगडी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम तसेच १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, यासह गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, अशा स्पर्धा होणार आहेत. तर यावर्षी पहिल्यांदाच दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठीही वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सिंधुदुर्गनगरीतील पोलीस कवायत मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुल येथे दोन दिवस क्रीडा स्पर्धांचा उत्सव साजरा होणार आहे.

  • खास आकर्षण

जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता होणार असून त्यानंतर खास आकर्षण म्हणून जिल्हा परिषद अधिकारी आणि मुख्यालयातील पत्रकार यांच्यातील प्रदर्शनीय क्रिकेट सामना रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!