वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रमेश नारनवर यांचा मुलगा आर्यन याची निवड जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे झाली आहे. आर्यन हा कणकवली वरवडे येथील सेंट उर्सुला हायस्कुल चा सध्या सहावीतील विद्यार्थी असून इयत्ता पाचवीसाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत त्याने उज्ज्वल यश संपादन केले आहे. या यशासाठी त्याला मुख्याध्यापक, शिक्षक वृंद ,आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल आर्यन चे अभिनंदन होत आहे.
आर्यन नारनवर ची नवोदय विद्यालयात निवड












