कणकवली (प्रतिनिधी): दै.पुढारी चे माजी कार्यालय अधीक्षक आनंद जिवाजी पाताडे यांचे कणकवलीत खाजगी रुग्णालयात 5 जुलै रोजी निधन झाले. मूळ कासार्डे गावचे रहिवासी असलेले पाताडे यांनी विविध खाजगी संस्थांत अधिकारीपदावर काम केले होते.दै.पुढारी मध्ये त्यांनी कार्यालय अधीक्षक म्हणून काही वर्षे काम केले होते. त्यांच्या पश्चत पत्नी, आई, दोन मुलगे, सून,मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी कासार्डे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
दै पुढारी चे माजी कार्यालय अधीक्षक आनंद पाताडे यांचे निधन












