लोरे नं 1 ग्रामपंचायत च्या कामाचे केले कौतुक
कणकवली (प्रतिनिधी): लोरे नं 1 गावात सर्वप्रथम राज स्तरिय स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण समिती SSG 2023 यांनी भेट देत ग्रामपंचायत च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत कामांची पाहणी केली समिती अध्यक्ष विजय पाटील अभिषेक पाटील संतोष घाडगे यांनी गावात भेट देत गृह भेटी तसेच कामाची पाहणी केली व ग्रामस्थांशी चर्चा केली . लोरे नं 1 गावातील या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचे आणि ग्रामपंचायत ने राबवलेल्या उपक्रमांचे समितीने कौतुक केले. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत अधिक व्यापक जनजागृती करून ग्रामस्थांशी सुसंवाद वाढवून गाव नेहमीच स्वच्छ सुंदर ठेवण्याच्या सूचना केल्या.यावेळी कणकवली तालुक्याचे माजी सभापती मनोज रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण ,सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत वारंग, लोरे नं 1 गावचे सरपंच अजय रावराणे उपसरपंच सुमन गुरव ग्रामसेवक ऋतुराज कदम ग्रा.पं सदस्य नरेश गुरव, सुनिल रावराणे, सतिश कासले, खाडये तसेच सिधुदुर्ग जिल्हा परिषद बीआरसी कक्षाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.












