आरोग्याच्या हक्कासाठी श्रमजीवींचे तीव्र आंदोलन.
खारेपाटण (प्रतिनिधी) : अंबरनाथ तालुक्यातील मांगरूल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. त्याठिकाणी दोन एमबीबीएस डाँक्टरांची नियुक्ती असूनही ते मुक्कामी राहत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेसाठी २४ तास सुरू असणे अपेक्षित असताना हे आरोग्य केंद्र संध्याकाळी ५ वाजताच बंद केले जाते.आणि यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील दुर्गम गाव पाड्यांतील गोरगरीब श्रमजीवी, आदिवासी कातकरी नागरिकांना हक्काची आरोग्य सेवा मिळत नाही.आरोग्य केंद्राच्या या दुरावस्थेमुळेच गेल्या आठवड्यात गौतम बाळ्या वाघ या १६ वर्षांच्या कातकरी तरूणाला उपचारासाठी पुढे नेत असताना सर्पदंशाने वाटेतच त्याचा मृत्यु झाला. या सर्व परिस्थीतीमुळे श्रमजीवी संघटना महाराष्ट्रच्या अंबरनाथ तालुका शाखेने आज मांगरूल प्राथमिक आरोग्य केंद्रावर तीव्र आंदोलन केले.यावेळी मोर्चातील सहभागींनी आरोग्य सेवा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची…डाँक्टर २४ तास दवाखान्याच थांबलेच पाहिजे… अशा जोरदार दिल्या.
आंदोलन प्रसंगी तालुका वैद्यकीय आधिकारी डाॕ.अर्चना मोहीते , मांगरूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डाॕ.बनसोडे व डाॕ.उपाध्याय यांनी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा केली. व यापुढे मांगरूलच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास आरोग्य सेवा देण्याचे ,येत्या सात दिवसात डाँक्टरांच्या निवासाची व्यावस्था पाहुन मुख्यालयी वस्तीला राहाणार असल्याचे मान्य केले. तसेच पोलिसांची मदत घेवून प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा ताब्यात घेऊन जागेचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे मान्य केले. तसेच या पुढे कोणत्याही गरोदर मातेला उपचारासाठी पुढे रेफर न करता पिएचसीमधेच डिलेव्हरी करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.














