रोटेरियन स्नेहल रावराणे यांची अध्यक्षपदी, रोटेरियन दिनकर केळकर यांची सचिवपदी आणि रोटेरियन नेहा रावराणे यांची खजिनदारपदी निवड
वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या रोटरी वर्ष 2026–27 साठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, रोटेरियन स्नेहल रावराणे यांची अध्यक्षपदी, रोटेरियन दिनकर केळकर यांची सचिवपदी आणि रोटेरियन नेहा रावराणे यांची खजिनदारपदी निवड झाली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. यावेळी क्लबच्या सदस्यांनी नव्या नेतृत्वाचे स्वागत करून त्यांना आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी अध्यक्ष रोटेरियन सचिन रावराणे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने गेल्या काही वर्षांत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली असून, नवीन नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली क्लब सेवा, मैत्री आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा अधिक प्रभावीपणे पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोटरी वर्ष 2025–26 मध्ये अध्यक्ष म्हणून कार्य करताना सर्व सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच, क्लबच्या सर्व सदस्यांनी एकदिलाने नवीन पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून अधिकाधिक समाजोपयोगी प्रकल्प राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. रोटरीच्या “Service Above Self” (स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ) या ब्रीदवाक्यानुसार रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आगामी वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवक विकास आणि सामाजिक सेवेशी संबंधित विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविणार असल्याचे नव्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

स्नेहल रावराणे अध्यक्ष

दिनकर केळकर सचिव

नेहा रावराणे खजिनदार











