निवृत्त शिक्षकांच्या नेमणूकाना मान्यता देणे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – अमित सामंत

कुडाळ (अमोल गोसावी) : डीएड बीएड उमेदवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण पाठीशी असून वेळ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्पष्ट केले,

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागी जिल्ह्यातीलच डी,एड बी एड उमेदवारांनाच संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली असून आपल्या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे अनेक डी,एड बी,एड पात्र उमेदवार उपलब्ध आहेत,आणि ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत,बेकार आहेत,याची जरा जरी शासनाला आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना जाण असती तर रिक्त असलेल्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांच्या नेमणुका करण्याचा निर्णय घेतला नसता,पण राज्य सरकार व शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना आपल्याच जिल्ह्यातील बेकार डी एड बी एड उमेदवारांवर अन्यायच करायचा त्यांचे खच्चीकरणच करायचे,हे ठरवून केल्याचे द्योतक आहे,असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी लगावला आहे,

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळा मध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, सरकारने शिक्षक भरती बंद केली आहे,तसेच आंतरजिल्हा शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करून त्यांना मुक्त केले आहे, परंतू रिक्त झालेल्या जागेवर नवीन शिक्षक भरती करण्याचे सोडून डी,एड बी,एड उमेदवारांवराच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार राज्य सरकार करत आहे,त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकवर्ग आक्रमक झाला आहे,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११३० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत,ही कमतरता भरून काढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त असलेल्या शाळांमध्ये तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात निवृत्त शिक्षकांच्या नेमणूका करण्यात येतील असे जाहीर केले असून तसे आदेश महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या उपसचिवानी काढलेले आहेत,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक होण्याचे मनसुबे आखलेल्या शेकडो डी,एड,बीएड विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे,जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पात्र शिक्षक उमेदवार आहेत तर निवृत्त शिक्षकांचाच हट्टाहास का ॽ सरकारच्या या आत्मघातकी निर्णयाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी,एड बी,एड उमेदवारांवर घोर अन्याय होत आहे,यासाठी राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त असलेल्या शिक्षकांचे जागी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकार डी,एड बी,एड विद्यार्थ्यांना संधी दिली तर बेकारी कमी होऊन स्थानिक डी,एड बी,एड उमेदवारांना दिलासा मिळेल,यासाठी राज्य सरकार, शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण, राज्याचे शिक्षण उपसंचालक यांनी यावर फेर विचार करून निवृत्त कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय रद्द करून बेकार डी,एड बी,एड उमेदवारांवराना संधी द्यावी, तसेच न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी,एड बी,एड उमेदवारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षमपणे उभी राहिल,वेळ पडल्यास डीएड बीएड उमेदवारांना व पालकांना घेऊन राज्य सरकार यांच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी दिला आहे,

error: Content is protected !!