राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक कायम, कार्याध्यक्षपदी काका कुडाळकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हाध्यक्ष पदी अखेर अबिद नाईक यांचे नावावर शिक्कामोर्तब झाले असून जिल्हा कार्याध्यक्षपदी काका कुडाळकर यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. अबिद नाईक यांना जिल्हाध्यक्ष नियुक्त केल्यानंतर एक गट नाराज होता.त्यानंतर वरिष्ठांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे जाहीर करत अबिद नाईक यांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती दिली होती. आज मुंबईत देवगिरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अबिद नाईक यांची जिल्हाध्यक्षपदी निवड कायम ठेवण्यात आली तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी काका कुडाळकर यांची निवड जाहीर करण्यात आली.

error: Content is protected !!