धामापूर बौद्धवाडी प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक आहेत दिपक गोसावी.
कुडाळ (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर बौद्धवाडी प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. दिपक केशव गोसावी यांना नुकतेच राज्य स्तरीय छत्रपती शाहू महाराज प्रेरणा गौरव पुरस्कारने सन्मानित
कै. बळवंत नागू शिंगाडे चॅरीटेबल ट्रस्ट बेडकीहाळ अंतर्गत 3 रे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नुकतेच बेडकीहाळ येथे सपन्न झाले. या संमेलतात राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 11 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्या सर्व शिक्षकांना राज्यस्तरीय छ. शाहू महाराज प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण तालुक्यातील धामापूर बौद्धवाडी प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. दिपक केशव गोसावी यांच्या शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्याना सदरचा पुरस्कार देऊन या साहित्य संमेलनात गौरविण्यात आले. मेडल, कोल्हापुरी फेटा, मानपात्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम डॉ. श्री विक्रम शिंगाडे यांच्या नियोजनखाली करण्यात आला. श्री दिपक गोसावी यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











