वरवडे माजी उपसरपंच प्रमोद गावडेंचा वाढदिवस उत्साहात झाला साजरा

सोनू सावंत मित्रमंडळासह शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे, भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावचे माजी उपसरपंच प्रमोद गावडे यांचा वाढदिवस कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोनू सावंत मित्रमंडळासह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, आशिये सरपंच महेश गुरव, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे भाई परब, सुशील सावंत, महेंद्र सांब्रेकर, बच्चू प्रभुगावकर, वागदे सरपंच संदीप सावंत, सावडाव उपसरपंच दत्ता काटे आदींसह भाजपा कार्यकर्त्यांनी गावडे यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या. व्यवसायाने रिक्षाचालक असलेले प्रमोद गावडे हे भाजपा तालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे निकटचे सहकारी आहेत.आमदार नितेश राणेंचा कट्टर कार्यकर्ता असलेले प्रमोद गावडे यांचा वाढदिवस आज कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्य कार्यकर्ता असला तरी त्याचे अनमोल महत्व आपल्या काळजात आहे, वरवडे गावातील सर्वच ग्रामस्थांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी असणारा कार्यकर्ता म्हणून प्रमोद गावडे यांची ओळख असून त्यांनी यापुढील आयुष्यात समाजकारण आणि राजकारणात सक्रिय राहावे अशा शब्दांत सोनू सावंत यांनी प्रमोद यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वरवडे उपसरपंच अमोल बोन्द्रे, वरवडे तंटामुक्ती समिती अध्यक्ष हनुमंत बोन्द्रे, सादिक कुडाळकर, सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तसेच सोनू सावंत मित्रमंडळाचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!