तळीराम लिपिकाचा हॉस्पिटलमध्ये ऑन ड्युटी धिंगाणा

वैभववाडीः (प्रतिनिधी) : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील तळीराम लिपिकाने ऑन ड्युटी दारु पिऊन रुग्णालयात धिंगाना घातला. रुग्णालयातील डाॕक्टर आणि सहकारी  कर्मचाऱ्यांशी उध्दट बोलत हुज्जत घालण्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. सुमारास घडली. माञ याबाबत कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल नाही.

हा तळीराम लिपिक बहुतेकदा मध्यधुंद अवस्थेतच कामावर येतो. या अगोदर त्याची वैदयकिय अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडेही तक्रार केली आहे. माञ त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्यामुळे डाॕक्टरांसह इतर कर्मचारी हैराण झाले आहेत. सोमवारी सकाळी पुन्हा त्या तळीराम  लिपिकाने गटारी साजरी करत मद्यधुंद अवस्थेत रुग्णांसमोरच आरडाओरडा करुन धिंगाणा केला. शासनाचा पगार घेऊन आपली कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या या तळीराम लिपिकाच्या अकार्यक्षमतेमुळे डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे पगारही ग्रँट असतानाही वेळेत होत नाहीत. या तळीराम लिपिकाची वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातून बदली करण्याची मागणी होत आहे.

error: Content is protected !!