राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या फायबर होडी पूरस्थितीत आल्या उपयोगी

बांद्यातील पूरग्रस्तांनी  अमित सामंत यांच्या प्रति व्यक्त केली कृतज्ञता

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 3 दिवस होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. बांदा परिसरात देखील  परिस्थिती निर्माण झाली असून गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आपत्कालीन स्थितीत खबरदारी म्हणून  फायबर होडी देण्यात आली होती.  याच फायबर होडी चा उपयोग यावर्षी पूरस्थितीमध्ये बांदा परिसरातील नागरिकांना झाला. पूरस्थितीत नागरिकांना मदतकार्यात अत्यंत महत्वाचे ठरणाऱ्या फायबर होडीचा वापर करताना स्थानिक नागरिक अमित सामंत यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते. अमित सामंत यांच्याप्रति बांदा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता म्हणजे सामंत याना निष्क्रिय जिल्हाध्यक्ष म्हणणाऱ्यांना चपराक आहे. गतवर्षी बांदा येथे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा अमित सामंत यांनी घेतला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आपत्कालीन स्थितीत मदतकार्य पोचवण्यासाठी फायबर होडी देण्याची मागणी अमित सामंत यांच्याकडे केली होती.अमित सामंत यांनी फायबर होडी देण्याचा शब्द स्थानिक नागरिकांना दिला होता. दिलेल्या शब्दानुसार अमित सामंत यांनी बांदा परिसरातील नागरिकांना मदतकार्य मिळावे यासाठी फायबर होडी उपलब्ध करून दिली होती.मागील 3 दिवसांच्या अतिवृष्टीमुळे आज निर्माण झालेल्या पूरस्थितीत ही फायबर होडी उपयोगात आली.

error: Content is protected !!