ह्युमन राईटच्या निवेदनाची दखल; पटवर्धन चौकातील वाहतूक कोंडीला घातला आळा
कणकवली (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व कणकवली पटवर्धन चौक येथील रिक्षा चालक यांच्या वतीने वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांचा आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कणकवली शहरातील पटवर्धन चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या पार्किंग केल्या जात होत्या व यामुळे वाहतूक कोंडी वाढत असे यासाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनला निवेदन दिले होते. परंतु काहीच कारवाई होत नव्हती. कणकवली पोलीस स्टेशनचे नूतन पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांनी पटवर्धन चौकात होणारे पार्किंग व वाहतूक कोंडी बंद केली व शहरातील पटवर्धन चौकाने मोकळा श्वास घेतला.
सत्कार करताना उपस्थित ह्युमन राईट असोसिएशन प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफभाई पीरखान, अध्यक्ष सौ. संजना सदडेकर, सचिव मनोज वारे, उपाध्यक्ष सदाशिव राणे, सदस्य भरत तळवडेकर तसेच रिक्षा चालक मोहन सावंत, गजानन लाड, गुरव, अमर सावंत, भोगले, सावंत,राणे, होमगार्ड सुमित वारंग, प्रसन्न सकपाळ आदी उपस्थित होते.











