वैभववाडी (प्रतिनिधी) : न्यायाची चाड, अन्यायाची चीड’ आणि ‘त्याग व सेवा’ हे ब्रीद घेऊन शिक्षण, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 22 जुलै हा स्थापना दिन संपूर्ण महाराष्ट्रभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी साजरा केला जातो. जिल्ह्यात ठिकठिकाणी यानिमित्ताने रक्तदान शिबीर, गरजू व्यक्तींना जीवनावश्यक साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी उपक्रम घेण्यात आले.वैभववाडी शाखेच्या वतीनेही या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समितीचे संस्थापक कै. भा.वा. शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथील रुग्णांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर ‘झाडे लावूया – झाडे जगवूया’ हा संदेश देत येथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा प्रवक्ता सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुहास रावराणे, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर गोसावी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल जाधव, तालुका सचिव महादेव शेट्ये, तालुका नेते सुरेंद्र साळुंखे, गजानन टक्के, विवेकानंद कडू, जयवंत मोरे, पंढरीनाथ सावंत, विश्वनाथ चव्हाण, शिवराज कर्ले आदी समिती शिलेदार उपस्थित होते.













