ग्रामस्थांनी झाडे केली बाजूला
कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरूर सोलयेवाडी येथील नामदेव पार्सेकर यांच्या घरावर सोलयेवाडी रस्त्यावर असलेल्या भल्या मोठ्या वडाच्या फांद्या तुटून पार्सेकर यांच्या घरावर कोसळल्या यात त्यांच्या घराचे नुकसान झाले. विद्युत तारा देखील रस्त्यावर कोसळल्या आहेत. तेथील ग्रामस्थ अवधूत प्रभू, राजन प्रभू, नामदेव पार्सेकर, तुकाराम पार्सेकर, नारायण लिंगे यांनी तातडीने सर्व झाडे बाजूला करत पार्सेकर यांचे घर आणि रस्ता मोकळा केला.














