अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सवंतवाडी तालुक्यात आजगाव येथे अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर च्या नावाखाली कुंटणखाना चालविणाऱ्या संतोष लुडबे चा जामीन अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी आज फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आजगाव येथे अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर च्या नावाखाली परजिल्ह्यातील मुलींना आणून लुडबे हा वेश्याव्यवसाय चालवत होता. याबद्दल पिटा कायद्यांतर्गत कलम 3, 4, 5 तसेच आयपीसी कलम 370 नुसार गुन्हा दाखल करून लुडबे याला अटक करण्यात आली.पोलीस कोठडी ची मुदत संपल्यापासून लुडबे हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने सादर केलेल्या जामीन अर्जावर 19 जुलै रोजी सुनावणी झाली होती.त्यावेळी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी जामीन अर्जाला हरकत घेताना कुंटणखाना चालवताना लुडबे हा रंगेहाथ सापडला आहे. 3 पीडित मुलीही पोलिसांच्या छाप्यात सापडल्या आहेत. वेश्याव्यवसायासाठी रोख रक्कमही छप्यात सापडली असून आरोपिकडून जप्त केली आहे . समाजस्वास्थ्य बिघडविण्याचे काम हा आरोपी करत आहे.आरोपी चे कृत्य समाजविघातक आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचाही हवाला तोडकरी यांनी दिला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी संतोष लुडबे याचा जामीन अर्जा फेटाळण्यात आला.
