कासार्डे विद्यालयात आजपासून ५ दिवस मोफत ‘बालसंस्कार शिबिराचे’आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कासार्डे यांच्यावतीने दशक्रोशीतील ६ ते १३ वयोगटातील मुलां- मुलींसाठी ‘मोफत बालसंस्कार शिबिराचे’ आयोजन दि. 26 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत स.,८.१५ ते स.११.१५ या वेळेत करण्यात आले आहे.
या मोफत शिबिरात- परिपाठ, ‘बालपणीचे खेळ, रस्सीखेच,स्टेम लर्निंग, योगासने,मनोरंजनात्मक प्रयोग, ज्यूदो-कराटे,आईसब्रेकिंग,विविध मनोरंजक खेळ,खेळातून विज्ञान,हसत खेळत इंग्रजी, वैदिक गणित, कलावर्ग व मनोरंजक खेळ,विविध कला गुणदर्शन आणि रंगवलीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व सहभागी शिबीरीर्थ्यींना विद्यालयात मार्फत अल्पोपहार सोय करण्यात आली आहे.तसेच शिबीराची प्रवेश व नाव नोंदणी स.७.३० पासून सुरू राहणार आहे.

तरी दशक्रोशीमधील वयवर्षे ६ ते १३ वयोगटातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी.बी.बिसुरे व पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांनी केले आहे.

error: Content is protected !!