खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण,शिवाजी पेठ गावचे रहिवासी असलेले व खारेपाटण दशक्रोशितील गोर – गरीब जनतेचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ.पद्मनाभ माधवन बालन यांचे आज सोमवार दि.२४/७/२०२३ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
डॉ.बालन यांनी खारेपाटण गावात गेली ५० वर्षापेक्षा अधिक काळ खाजगी वैद्यकिय सेवा करत खारेपाटणसह आजुबाजूच्या सुमारे ४०/५० गावातील गोर-गरीब जनतेवर कमी दरात उपचार केले. तर. वेळप्रसंगी रात्री अपरात्री कधीही सकंटाला धाऊन येणारे गरीबांचे डॉक्टर म्हणून देखील प्रसिद्ध होते.खारेपाटण गावचे प्रसिद्ध डॉक्टर उमेश बालन यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुलगे एक मुलगी सूना नातवंडे असा परिवार आहे. डॉ. बालन यांच्या निधनाची बातमी खारेपाटण गावात समजताच खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या वतीने दुपारनंतर संपूर्ण खारेपाटण बाजारपेठ बंद ठेवण्यात येऊन डॉ. बालन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
