जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मच्छीमार बांधव व भगिनींशी साधला संवाद
मच्छीमार बांधव व भगिनींनी मानले देवाभाऊंचे आभार !!!
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपाच्या गाव वस्ती संपर्क अभियान अंतर्गत जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक यांच्या समवेत वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील कांबळीवाडी व बागायतकर वाडी या मच्छिमार वस्तीत भेट देऊन महायुती सरकारने मच्छिमारांसाठी जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबाबत माहीती दिली. तसेच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्यामुळे कोणकोणते लाभ मिळणार आहेत याबाबत जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी विस्त्रुत माहीती दिली.
यावेळी उपस्थित मच्छीमार बांधव व भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे तसेच महायुती सरकारचे आभार व्यक्त केले. यावेळी वायंगणी शक्तिकेंद्र प्रमुख हर्षद साळगांवकर, बुथप्रमुख अनंत केळजी, शेखर येरागी, सुनील भोगवेकर, गणपत कांबळी, मंदार माडये, पुरुषोत्तम कांबळी, मिथुन कांबळी, विजया कांबळी, लक्ष्मी भोगवेकर, मनाली कांबळी, विद्या कांबळी, रेक्ष्मा कांबळी, शुभांगी भोगवेकर, सुजाता कांबळी, अगोस्तीन राॅड्रीक्स, ममता कांबळी, सुषमा कांबळी, सरीता कांबळी, रमेश खोबरेकर, हेमंत येरागी, शशी पेडणेकर, विजय म्हाकले, संजय येरागी, रंजना गिरप, शेखर खोबरेकर, राखी येरागी, कामिनी खोबरेकर, विजया म्हाकले, प्रमोद केळुसकर, भालचंद्र तोरस्कर, मंगल खोबरेकर, चंद्रकला म्हाकले, अनिता खोबरेकर, विनोद तोरस्कर, जयानंद म्हापणकर, राजु कोंडुरकर, गोपाळ तारी, संदिप पेडणेकर, जयश्री येरागी, गौरी तारी असे बहुसंख्य मच्छीमार उपस्थित होते.














