भ्याड हल्ल्याच्या विरोधात देशाच्या नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेस फोंडावासी यांची समर्थ साथ ! अतिरेकांना सक्षम धडा शिकवा – संजना आग्रे

फोंडाघाट मध्ये श्रद्धांजली व शोकसभा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे, आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ कुटुंबकर्त्यांना आपले प्राण गमवावे लागले. याबाबत ठोस निर्णय घेण्यास आपले सरकार व नेतृत्व खंबीर आहे. कठोर निर्णय घेऊन आतंक्यवाद्यांचा समूळ नायनाट करावा. त्यासाठी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयास फोंडावासीयांची समर्थ साथ राहील.काहीही संबंध नसताना नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवा.अशी आग्रही मागणी फोंडाघाट सरपंच सौ .संजना आग्रे यांनी केली. फोंडाघाट ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने पेठेतील राधाकृष्ण मंदिर येथे,श्रद्धांजली शोकसभा आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या…

यावेळी सूत्रसंचालक संतोष टक्के,अजित नाडकर्णी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ग्रामपंचायत सदस्य पिंटू पटेल, पवन भोगले, प्राची धुरी, सोसायटी चेअरमन राजन नानचे, व्यापारी संघटना अध्यक्ष यशवंत मसूरकर,वैश्य समाज पतसंस्था चेअरमन बाळा वळंजू ,विश्वनाथ जाधव,सुभाष मरिये, प्रथमेश रेवडेकर, वैष्णव पटेल, एकता सावंत इत्यादी उपस्थित होते. दोन मिनिटे स्तब्धता पाळुन मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि कुटुंबीयांना उभारण्याचे बळ लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.

error: Content is protected !!