खारेपाटण येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी क्रीडा शिबिराचा शुभारंभ संपन्न…

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव व श्री संकेत शेट्ये यांच्या सौजन्याने विविध गटातील शालेय विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा शिबिराचा शुभारंभ आज खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.

खारेपाटण येथील केदारेश्वर मैदानाच्या भव्य पटांगणावर आयजित करण्यात आलेल्या या समर क्रीडा शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी डॉ.शंकर राणे,सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत शेट्ये,भाऊ राणे,सुधीर कुबल,तेजस राऊत,किरण गुरव,महावीर होनाळे,विठ्ठल गुरव, प्रकाश कांबळे,क्रीडा प्रशिक्षक श्री श्री अमोल चौगुले सर आदी मान्यवर  

उपस्थित होते.तर हे क्रीडा शिबिर दि.२५ एप्रिल २०२५ ते ५ मे २०२५ या कालावधीत सलग १० दिवस सुरू राहणार आहे.

या शिबिरात व्हॉलीबॉल, क्रिकेट,सेपक टकराव,लेझिम, लाठीकाठी मर्दानी खेळ,नृत्य आदी खेळ व कलांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या शारीरिक शमतेत वाढ होऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणे यासाठी या विविध खेळांचे उन्हाळी शालेय सुट्टीत विशेष क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी क्रीडा प्रशिक्षक श्री अमोल चौगुले सर यांनी दिली.

तसेच या शिबिराच्या कालावधीत राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभणार असून शिबिरातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व मेडल्स देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

error: Content is protected !!