लोरे नं १ मध्ये शाळा तेथे दाखले वाटप कार्यक्रम

तहसीलदार कार्यालय आणि लोरे नं १ ग्रा. पं. चा उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : तहसील कार्यालय कणकवली व ग्रामपंचायत लोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने २५ एप्रिल रोजी १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत शाळा तेथे दाखले वाटप हा उपक्रम ग्रामपंचायत कार्यालय लोरे येथे यशस्वीरित्या पार पडला .सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली तालुक्याचे आदरणीय तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती कणकवली चे माजी सभापती मनोज रावराणे यांनी केले कार्यक्रमाचा उद्देश तसेच रूपरेषा तहसीलदार यांनी सांगितली. शालेय मुलांना विविध दाखल्यांसाठी कणकवली कार्यालयाकडे ४ ते ५ वेळा जावे लागते यामध्ये ग्रामस्थांचा‌पैसा व वेळ वाया जातो म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास लोरे ,वाघेरी पियाळी,व घोणसरी गावातील शाळेकरी मुले आणि ग्रामस्थ यांनी लाभ घेतला यामध्ये एकूण
उत्पन्न दाखले-४२,
जात प्रमाणपत्र-२३,
वय अधिवास प्रमाणपत्र-११,
रेशन कार्ड वर नाव कमी करणे -७
रेशन कार्ड वर नाव घालने ‌-४
या प्रमाणात दाखले काढण्यात आले सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत लोरे सरपंच अजय रावराणे,उपसरपंच सुमन गुरव, तसेच मंडळ अधिकारी प्रवीण मोंडे व दिलीप पाटील, तलाठी श्री.शिंदे भाऊ, खेडेकर मॅडम,अमृता भुसके, तसेच ग्रामपंचायत अधिकारी राकेश गोवळकर, संगीता पाटीलअय्याझ हवालदार, तहसील कार्यालय कणकवली चे सेतू कर्मचारी, पोलीस पाटील ,ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, तसेच सुनील रावराणे,चंद्रकांत तेली, अमित दळवी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता लोरे सरपंच अजय रावराणे यांनी केली.

error: Content is protected !!