कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कळसुली परबवाडी पिंपळेश्वर नगर ते गावकरवाडी उल्हासनगर रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्याचा शुभारंभ आज भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यामुळे पिंपळेश्वर नगर, उल्हासनगर येथील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने फायदा होणार असून या कामाबाबाबत रहिवाश्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी कळसुली सरपंच सचिन पारधिये, उपसरपंच गणेश मठकर, शामसुंदर दळवी, मानसी दळवी, भारती देसाई, प्रवीण दळवी, दीपक मेस्त्री, राजू नार्वेकर, जयवंत घाडीगांवकर, लाडू गावकर, हेमंत वारंग, श्री. सावंत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कळसुली परबवाडी पिंपळेश्वर नगर ते गावकरवाडी उल्हासनगर रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ












