आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आचरा हिर्लेवाडी येथील रहिवासी प्रविण (पि.टी) तुकाराम कांबळी (रा. मुंबई) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे नुकतेच निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. 1982 ते 1997 या काळात टेनिस बाँल क्रिकेट मध्ये जिल्हातील नामवंत क्रिकेट खेळाडूत प्रविण(पी.टी) यांचे नाव होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पुतणे, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते किशोर कांबळे यांचे ते भाऊ होत. त्यांच्या निधनाने सर्वत दुखः व्यक्त केले जात आहे.