घटनास्थळी भाजप नेते रणजीत देसाई यांची पाहणी
कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरड कोसळून नुकसान होत आहे. काल अतिवृष्टीमुळे कांडरीवाडी येथील विठोबाची खांद या ठिकाणी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. आज भाजप नेते तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. रणजित देसाई आणि माजी पंचायत समिती सदस्य श्री. संदेश नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सोबत ग्रामपंचायत सदस्य श्री. पपू नारिंगेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.