कुडाळ व मालवण तालुक्यातील विविध विकासकामसंदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची भेट

कुडाळ मालवण तालुक्यातील २५/१५ व पर्यटन विषयक विकास कामांसंदर्भातील सकारात्मक चर्चा

कुडाळ ( अमोल गोसावी ) : भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा निवडणुक प्रभारी, तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आज, कुडाळ मालवण मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ व मालवण तालुक्यात २५/१५ तसेच पर्यटन विषयक विविध विकासकामांची यादी निलेश राणे यांनी ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांना सुपूर्द केली. कुडाळ व मालवण तालुक्यात भारतीय जनता पार्टी कडून जनसंपर्क अभियान राबविण्यात आले होते, यावेळी भेट दिलेल्या ठिकाणावरून सुचविण्यात आलेल्या विकासकामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी निलेश राणे यांनी आज ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेत विकासनिधीची मागणी केली, यावेळी आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!