वारगाव जि.प.शाळा नं.३ च्या वतीने एक दिवस बळीराजासाठी उपक्रम

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारगाव नं. ३ या शाळेच्या वतीने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम नुकताच उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब शेट्ये यांच्या शेतामध्ये नुकताच साजरा करण्यात आला .यावेळी त्यांनी मुलांना शेती विषयी मार्गदर्शन केले व शेतीचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच वारगाव गावच्या सरपंच नम्रता शेट्ये यांनीही विद्यार्थ्यांना शेतीचे महत्व सांगितले या सर्व उपक्रमाला केंद्रप्रमुख गोपाळ जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना सावंत ,सत्यवान केसरकर सर,अर्चना तळगावकर, वंशिका महाडेश्वर व रविंद्र जयराम लोकरे सर आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!